Saturday, 9 October 2021

राजे विक्रमसिंग घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

 राजे फाऊंडेशन मार्फत आदर्श शिक्षिका पुरस्कार  मला कोणताही प्रस्ताव न करता  जाहिर झाला तेव्हा माझा विश्वास बसला की आपले काम प्रामाणिकपणे व स्वतः ला झोकून देऊन केले की त्याचे मोजमाप कोठेतरी होत असते.आभार मानायचे ते  म्हणजे राजे विक्रमसिंग घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीचे.आजच्या या दुकानदारी दुनियेत फार मोठे राजकीय संघटनात्मक पाठबळ माझ्या मागे नसताना पडद्यामागे मी व माझे विद्यार्थी यातच रममाण असणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य शिक्षिकेला आदर्शांचे बिरूद सन्मानाने बहाल केलंत हे या कलियुगात अप्रूपच.खरंच आपण शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हेच दाखवून दिलात.या सावित्रीच्या लेकीचा आपल्या संस्थेला  संस्थेचे प्रमुख, माननीय आईसाहेब, समरजीतदादांना व वहिनींना सलाम! पुरस्कार वितरण सोहळा तर अवर्णनीय च नियोजन बद्ध कार्यक्रम राजे फाऊंडेशनचे कार्यकर्ते व टिमचे करावे तितके कौतुक थोडेच,हा सोहळा म्हणजे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव.रयतेची काळजी घेणाऱ्या राजघराण्यातून सत्कार, सन्मान, पुरस्कार याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.

म्हणूनच माझा या सर्वांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏














कार्यक्रमास उपस्थित व शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

इयत्ता पहिली ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षातील इयत्ता पहिलीची गगन भरारी

*ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षा* *कन्या व केंद्र शाळा उत्तूर* *इयत्ता पहिलीची गगन भरारी* 💐💐💐💐💐💐💐💐 *🥇1.वृंदा सुशांत गोरे 100 राज्यात प्...